Tuesday, February 8, 2011

दिल्या घेतल्या वचनाची

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसंची शपथ तुला आहे||

बकुलिच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात
ह्रुदयांची ओलख पटली सुगंधी क्षणात
त्या सगळ्या बकुल फुलांची शपथ तुला आहे||

शुभ्र फुले रेखित रचिला चाँद तू जुईचा
म्हणालीस चंद्रोस्तव हा सावल्या बुईचा
फुलाताल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे||

भुर भुरता पाउस होता सोनिया उन्हात
गवातातुनी चालत होतो मोहिनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची शपथ तुला आहे||

हलू हलू काजलाताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटुनी येती असे अंतरंगी

या उदास आभालाची शपथ तुला आहे ||


- मंगेश पाडगावकर